ITR Filling: फॉर्म 16 शिवाय इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करता येणार का? जाणून घ्या नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे ।। नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. नवीन आर्थिक वर्षात सर्वजण आयटीआर फाइल करतात. आयटीआर फाइल (ITR File) करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. नोकरदार वर्ग आता आयटीआर फाइल करतील. वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळे आयटीआर फॉर्म असतात. तुम्हाला ते फॉर्म भरायचे असतात. केंद्र सरकारने २०२५-२६ साठी आयटीआर फॉर्मजारी केले आहेत. परंतु फॉर्म १६ शिवाय आयटीआर फाइल करता येत नाही. त्यामुळे अनेकजण फॉर्म १६ची वाट पाहत आहेत.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला आयटीआर फाइल करावा लागेल. यासाठी तुमच्याकडे फॉर्म १६ असणे खूप गरजेचे आहेत. हा फॉर्म १६ (Form 16) तुमची कंपनी तुम्हाला देते. यामध्ये तुमच्या वर्षभराची सॅलरी आणि टॅक्सची संपूर्ण माहिती मिळते.

फॉर्म १६ ह दोन भागांमध्ये असतो. Part A आणि Part B.
यामधील पहिल्या भागात तुमचे नाव, पत्ता, पॅन कार्ड, तुमच्या कंपनीचे TAN आणि प्रत्येक तिमाहीत किती टॅक्स कापला जातो. तो सरकारला जमा केला का याबाबत सर्व माहिती असेल.

Part B मध्ये संपूर्ण वर्षाची सॅलरी, टॅक्स फ्री अलाउंजेस (एचआरए, ट्रॅव्हल) आणि सेक्शन 80C, 80D अंतर्गत टॅक्स सूट याबाबत माहिती असेल. यामध्ये पीपीएफ, एलआयसी, मेडिकल इन्श्युरन्सची माहिती असेल.

Form 16 कधी मिळणार?
इन्कम टॅक्स नियम ३१ (३) नुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना दरवर्षी १५ जूनपर्यंत Form 16 सबमिट करायचा असतो. त्यामुळे यावर्षीही १५ जूनपर्यंत तुम्हाला Form 16मिळायला हवा. Form 16 मध्ये तुमच्या टॅक्सची, सॅलरीची सर्व माहिती असते. त्यामुळे आयटीआर फाइल करणे सोपे होते. यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Form 16 दिला जातो. आयटीआर फाइल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा जेणेकरुन तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *