मध्यपूर्वेत युद्धाचे ढग! पुणे–दुबई विमानसेवा दोन दिवस बंद; अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मार्च २०२६ ।। पुणे: मध्यपूर्वेत तणावाचा भडका उडाला असून त्याचे पडसाद आता थेट पुण्यात उमटू लागले आहेत. Israel–Iran संघर्ष तीव्र झाल्यानंतर आणि United Statesने इस्रायलच्या कारवाईला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. परिणामी पुणे ते दुबई आणि दुबई ते पुणे या मार्गावरील विमानसेवा आज आणि उद्या बंद ठेवण्यात आली आहे. दोन्ही दिशेची किमान दोन उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुबईतील परिस्थिती तणावपूर्ण असल्याने तेथील काही विमानतळांवरील हालचालींवर निर्बंध आणण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुबईत अडकलेल्या नागरिकांनी तातडीने भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी टोल-फ्री क्रमांक 800-46342 तसेच व्हॉट्सॲप क्रमांक +971543090571 जाहीर करण्यात आला आहे. इराणमध्ये असलेल्या नागरिकांनीही आपली नोंद दूतावासाकडे करावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बचाव आणि स्थलांतराबाबतचे पुढील अपडेट दूतावासाकडून दिले जाणार आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय समन्वय साधत असल्याचे समजते. संभाव्य रेस्क्यू ऑपरेशनसाठी तयारी सुरू असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने कळवले आहे.

दरम्यान, पुण्यातील एका नामांकित विद्यालयाचे ८४ जण दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. “स्टडी व्हिसिट”साठी गेलेला हा गट सुरक्षित असल्याची माहिती महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार यांनी दिली. ४२ मुलं आणि ४२ मुली असा हा विद्यार्थीसमूह असून सर्वजण सुखरूप आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. पालकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि महाविद्यालय प्रशासन यांच्यात समन्वय सुरू असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. युद्धाच्या सावटाखाली उभ्या असलेल्या या अनिश्चित काळात संयम, अधिकृत माहितीवर विश्वास आणि प्रशासनाशी संपर्क हेच सध्या नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *