Gold Price : सोन्यात आत्ताच पैसे गुंतवा ; भाव उसळी घेणार, प्रति तोळा भाव किती होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मे ।। गेल्या काही महिन्यात सोन्याचा भाव प्रचंड वाढला असून मागील महिन्यातच सोन्याचा प्रति तोळा दर एक लाखांवर पोहोचला होता. अशा परिस्थितीत, खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांचा खिसा कापला गेला पण, अलीकडे दर कमी झाल्यामुळे लोकांना खरेदीवर काहीसा दिलासा मिळाला पण, ग्राहकांचा आनंद फारकाळ टिकणार नाही असं दिसत आहे. येत्या काळात सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

सोन्याची झळाळी आणखी लखलखणार
अमेरिकन वित्तीय एजन्सी जेपी मॉर्गनने भाकित केले आहे की 2026 च्या मध्यापर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस 4,000 डॉलर्सचा टप्पा ओलांडू शकते. अलिकडच्या काळात बँकेने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, मंदीची वाढती चिंता आणि अमेरिकेने लादलेले उच्च शुल्क व अमेरिका-चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात.

सोन्याबाबतर JP मॉर्गनची भविष्यवाणी
यावर, जेपी मॉर्गनने 2025 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत सोन्याचा सरासरी दर प्रति औंस $3,675 पर्यंत असण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँकांकडून मागणी मजबूत राहिली तर किंमत आधीच 4 हजार डॉलर्सवार झेप घेईल. दुसरीकडे, जेपी मॉर्गनसह गोल्डमन सॅक्सनेही सोन्यावर तेजीची भूमिका घेतली आणि अलीकडेच 2025 च्या अखेरीस प्रति औंस $3,300 वरून $3,700 पर्यंत सोन्याच्या दरवाढीचा अंदाज वर्तवला आहे. गोल्डमन सॅक्सने म्हटले की पुढील वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत $4,500 च्या पुढे म्हणजेच 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

त्याचवेळी, गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढीचा कल दिसून येत आहे. भू-राजकीय तणावात वाढ आणि अमेरिकेच्या आर्थिक वाढीबाबत अनिश्चितता असून डॉलरमध्येही कमकुवतपणा दिसून येत आहे, ज्यामुळे सोन्याच्या दरवाढीला चालना मिळत आहे.

व्याज दरांबाबत भविष्यवाणी
सोन्याच्या दरवाढीबाबत जेपी मॉर्गनच्या अंदाजामागचे मुख्य कारण गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँकांकडून सतत होणारी खरेदी वाढणे आहे. यावर्षी सोन्याची मागणी सरासरी प्रति तिमाही 710 टन राहण्याचा अमेरिकन बँकेने अंदाज वर्तवला असून जेपी मॉर्गनने अंदाजांमध्ये संभाव्य नकारात्मक जोखीम देखील दर्शविल्या आहेत. सरकारी बँकांची मागणी कमकुवत झाली तर व्याजदर देखील वाढू शकतात, असं आंतरराष्ट्रीय बँकेने म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *