महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने पीएफ क्लेमसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पीएफ क्लेम अधिक सोपे होणार आहे. जर फक्त तुमच्या तारखांचा मेळ बसत नाहीये त्यामुळे तुमचा पीएफ रिजेक्ट होणार नाही. अनेकदा एकाच दिवशी पीएफ क्लेमच्या तारखा ओवरलपिंग व्हायच्या. त्यामुळे क्लेम रिजेक्ट केले जायचे. मात्र, आता इथून पुढे असं काहीही होणार नाही. याबाबत ईपीएफओने माहिती दिली आहे.
जर तुम्ही एक नोकरी सोडली अन् दुसऱ्या नोकरीसाठी जॉइन झाला. तर या दोन नोकऱ्यांमध्ये सर्व्हिस पीरियडचा कालावधी ओव्हरलॅपिंग होत असेल म्हणजेच तारखांचा मेळ जर बसत नसेल तरीही तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट होणार आहे. ईपीएफओने परिपत्रक जारी करुन माहिती दिली आहे.
ईपीएफओने (EPFO) असे सांगितले की, अनेक प्रादेशिक ऑफिसमध्ये जुन्या आणि नवीन नियोक्त्यांच्या नोदींमधील सर्व तारखा एकमेकांशी जुळत नाही. त्यामुळे पीएफ क्लेम रिजेक्ट होत होता.त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. परंतु आता या सर्व्हिस पीरियडच्या ओव्हरलॅपिंगमुळे तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट होणार नाही.
जुन्या नियोक्त्याला जर कामाच्या शेवटच्या दिवसाची नोंद करण्यास उशीर झाला तर पुढे सर्व तारखा पुढे जातात. नवीन नियोक्त्याकडे लवकर रुजू झाला किंवा रेकॉर्डमध्ये काही टायपिंग किंवा मॅनेजमेंट त्रुटी असतील तरीही तारखांचा मेळ बसत नाही. या छोट्या छोट्या कारणांमुळे कर्मचाऱ्यांचे पीएफ ट्रान्सफर होण्यास विलंब होतो. त्यामुळे आता जर ओव्हरलॅपिंग असेल तरीही तुमचा दावा नाकारला जाणार नाही.
ओव्हरलॅपिंग सर्व्हिस पीरियड म्हणजे काय?
जर एखाद्या कर्मचाऱ्याला मागील संस्थेतील कामाची शेवटची तारीख आणि नवीन ऑफिसमध्ये जॉइन होण्याची तारीख जुळते किंवा जुळत नाही तर त्याला ओव्हरलॅपिंग सर्व्हिस पीरियड असं म्हणतात. चुकींच्या नोंदीमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे हा गोंधळ होतो.