11th Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांनो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जून ।। अकरावीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. अकरावी प्रवेशासाठी 26 मे पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. आधी या नोंदणीसाठी 3 जूनपर्यंत मुदत होती. ती नंतर 5 पर्यंत वाढवण्यात आली. आज ५ जून गुरुवार दुपारी 2 वाजेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरू राहील.

धुळे
आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 15 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अंतिम नोंदणीचा आकडा आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. यंदा प्रथमच अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यात सुरुवातीला संकेतस्थळाला अडचणी आल्याने दोन दिवस उशिराने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातही पहिले दोन दिवस साइड स्लो चालणे, कागदपत्र अपलोड न होणे अशा अडचणी आल्या. ही स्थिती पाहता नोंदणीसाठी 5 जूनपर्यंत मुदतवाढ वाढविण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी
इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 39 हजार 416 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने यावर्षी जिल्ह्यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया लागू केली आहे. त्याची सुरुवात 26 मे पासून झाली. या प्रक्रियेत प्रत्यक्ष नोंदणी करण्यासाठी 3 जून पर्यंत मुदत होती. ही मूदत आजपर्यंत वाढवली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीसाठी प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटनांकडून झाली. त्यावर शिक्षण संचालनालयाने 5 जून पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *