Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला ; १ जुलैपासून लागू होणार नियम - Maharashtra 24

रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला ; १ जुलैपासून लागू होणार नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जून ।। भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता आपल्याला आधार कार्ड आणि ओटीपीशिवाय तत्काळ तिकिट बुक करता येणार नाही. १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी आवश्यक असणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. अर्थात आपले आयआरसीटीसी (IRCTC) खाते आधारशी लिंक नसेल, तर १ जुलैपासून आपल्याला तत्काळ तिकिटे बुक करता येणार नाही.

तत्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम असा –
रेल्वे मंत्रालयाने, आधार प्रमाणीकरणाशिवाय तत्काळ तिकिटांचे बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम १ जुलैपासून लागू होईल. यानंतर, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य असेल, असे असे रेल्वेने म्हटले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत दिली होती माहिती –
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. आता रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, १ जुलै २०२५ पासून, केवळ आधार व्हेरिफाइड युजर्स आयआरसीटीसी वेबसाइट अथवा अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकतील. यानंतर, १५ जुलैपासून, तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य केले जाईल.

असं करा आधार लिंक –
यासाठी, सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन लॉगइन करा.
आपले युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
‘My Account’ मध्ये जाऊन ‘Link Your Aadhaar’ ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर, आपला आधार क्रमांक आणि नाव टाका.
यानंतर, रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून नंतर सब्मिट म्हणा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *