महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करु शकतात. प्रत्येक वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते. त्यानंतर जुलै महिन्यात दुसऱ्यांदा वाढ होते. त्यामुळे आता जुलै महिना सुरु झाला आहे. यामुळे महागाई भत्त्यात कधी वाढ होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता मिळाला आहे. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याची घोषणा कधी होणार याची वाट कर्मचारी बघत आहेत.
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणारा हा शेवटचा महागाई भत्ता असू शकतो. २०२६ मध्ये ८वा वेतन आयोग करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या महागाई भत्त्यात कितीने वाढ होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
किती वाढणार महागाई भत्ता? (DA Hike)
जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. यावेळी जुलै महिन्यात DA/DR मध्ये ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. या महागाई भत्त्यात वाढ होईन ५८ टक्के होऊ शकते. परंतु याबाबत अजून निर्णय घ्यायचा आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महागाई भत्त्याची घोषणा कधी होणार? (When Will Dearness Allowance Implemented)
महागाई भत्ता जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. परंतु याबाबतची घोषणा कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जुलै महिन्यापासून जरी महागाई भत्ता लागू होणार असला तरीही त्याची घोषणा होण्यासाठी अजून वेळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्याची घोषणा केली जाते. त्यांना त्या महिन्यात जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्त्याची वाढ करुन दिली जाते.
महागाई भत्ता कसा ठरवला जातो?
७व्या वेतन आयोगानुसार मागील सहा महिन्याच्या AICPI-W च्या आकडेवारीनुसार भत्ता महागाई भत्ता ठरवला जातो. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारानुसार पगारात वाढ केली जाते.