महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। राज्यातील कोकणाच्या बहुतांश भागांत मुसळधार, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही जिल्ह्यांत यलो अलर्ट, तर मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, कोकण, विदर्भाच्या काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असल्याचे दिसून आले. (Latest Pune News)
तसेच, मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, पुणे शहर-जिल्हा, सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग या भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे.
असे आहेत यलो अलर्ट
पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट : चंद्रपूर.