भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या, या वस्तू होणार स्वस्त, पाहा यादी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर आज भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्यामध्ये आज लंडन येथे झालेल्या भेटीदरम्यान, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक वाढणार आहे. तसेच रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि इंग्लंडमधील या कराराबाबत जानेवारी २०२२ मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळामध्ये चर्चांना सुरुवात झाली होती. तसेच २०२४ पर्यंत हा करार पूर्णत्वास नेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या या व्यापार करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना गती मिळेल. तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होतीत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत १२० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असेल.

भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या मुक्त व्यापार करारामधील तरतुदींनुसार भारताला आपल्या ९९ टक्के निर्यात उत्पादनांना इंग्रंडमध्ये करमुक्त निर्यात करता येणार आहे. तर ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या ९० टक्के उत्पादनांवर वाजवी टॅरिफ लावण्यात येईल किंवा त्यावरी टॅरिफ हटवण्यात येईल. त्यामुळे भारतीय कंपन्यांसोबतच सर्वसामान्यांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या या व्यापार करारामुळे सर्वसामान्यांनाही बऱ्यापैकी फायदा होणार आहे. या करारामुळे औषधांपासून ते इलेक्ट्रॉनिक आणि सौंदर्य प्रसाधनांपर्यंतच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. मात्र काही वस्तू ह्या महागही होती. या करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, मरीन प्रॉडक्ट्स, स्टील आणि मेटल आणि ज्वेलरी ह्या वस्तू आता स्वस्त होऊ शकतात. तर कृषि उत्पादने, कार आणि दुचाकी, तसेच स्टीलसारख्या वस्तू महाग होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *