निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांचा ‘मास्टरस्ट्रोक’

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – *पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): दि.20 डिसेंबर- पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासराजकारणात मोठी खळबळ उडवत भाजपने एकाच वेळी विविध पक्षांतील मातब्बर नेत्यांचा जाहीर प्रवेश घडवून आणला आहे. निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ‘जम्बो एन्ट्री’मुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, निवडणुकीपूर्वीच भाजपचा विजयी शंखनाद झाल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी ते मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंतचा प्रवास वेगाने सुरू असून, या विकासप्रवासात सर्वसमावेशक नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकारण व समाजकारणात दीर्घ अनुभव असलेल्या विविध पक्षांतील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश करत विकासाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यात ठाकरे गट, अजित पवार गट तसेच शरद पवार गटातील अनेक माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संजोग वाघेरे, उषा वाघेरे, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, राजू मिसाळ, समीर मासुळकर, रवी लांडगे, जालिंदर शिंदे, अमित गावडे, संजय काटे, मीनल यादव, कुशाग्र कदम, प्रसाद शेट्टी, विनोद नढे यांच्यासह अनेक मान्यवरांचा यात समावेश आहे.

या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप संघटना अधिक बळकट होणार असून, आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.

शहर विकासाची घोडदौड कायम ठेवणार” – शंकर जगताप

सर्व नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत करताना आमदार शंकर जगताप म्हणाले, *“औद्योगिक नगरी, आयटी-सीटी स्मार्ट सिटी अशी ओळख पिंपरी-चिंचवडने निर्माण केली आहे. रोजगाराच्या संधी आणि अत्याधुनिक सुविधा यांचा संगम या शहरात झाला आहे. विरोध बाजूला ठेवून विकासाची भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळेच हे शक्य झाले. आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येकाने हीच विकासनिष्ठ भूमिका स्वीकारली असून, त्यांच्या सोबतीने शहर विकासाची घोडदौड अधिक वेगाने आणि ठामपणे पुढे नेली जाईल.”*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *