Horoscope Today दि. ३ फेब्रुवारी २०२६ ; आज जबाबदाराची जाणीव ठेवा….…….. ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ३ फेब्रुवारी |

मेष राशिभविष्य (Aries Horoscope )
सहज मिळणाऱ्या गोष्टींनी हुरळून जावू नये. भावंडांचे सहकार्य मिळेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. जवळचा प्रवास कराल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
संयमाची जोड घ्यावी लागेल. फार काळ विचार करत बसू नका. आपल्या मतावर ठाम राहाल. घरातील कामे आवडीने पार पाडाल. किरकोळ खरेदीत वेळ घालवाल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope )
एकावेळी अनेक कामे हातात घेवू नयेत. आपले वेगळेपण सिध्द करावे. ठाम निर्णय घ्यावेत. कामाचा आवाका लक्षात घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
आवक-जावक यांची उजळणी करावी. गोड बोलण्यावर भर द्यावा लागेल. जबाबदाराची जाणीव ठेवाल. तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्च वाढू शकतो.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
उत्साहाला आवर घालावी लागेल. कामामुळे थकवा जाणवेल. फार ताण घेवू नका. वेळ आणि काम यांची योग्य सांगड घालावी लागेल. दिरंगाई टाळावी.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
उघडपणे बोलणे टाळावे. जनविरोधापासून दूर राहावे. सामाजिक बाजू लक्षात घ्यावी. अपेक्षित लाभाचा आनंद घ्याल. झोपेची तक्रार दूर करावी.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अधिकारी व्यक्तीच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. व्यावसायिक लाभाचा दिवस. नम्रपणे वागावे. दृष्टीकोन बदलून पाहावा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
कामातील बदल जाणून घ्यावा. कार्यप्रविणता वाढीस लागेल. अति उत्साह टाळावा. अचानक धनलाभाची शक्यता. सारासार विचारला प्राधान्य द्यावे.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
चुकीचे विचार मनातून काढून टाका. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. कामातून आनंद शोधावा. गैरसमजुतीत अडकू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
गप्पांमध्ये रमून जाल. जोडीदाराच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक कराल. मुलांच्या तक्रारीकडे लक्ष द्या. पोटाची तक्रार जाणवू शकते. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. उष्णतेचे विकार जाणवतील. अकारण चीड-चीड करू नये. फसवणुकीपासून सावध राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
काही कामे रेंगाळतील. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व गाजवाल. आपलेच म्हणणे खरे कराल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनाची द्विधावस्था टाळावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *