Ullu App : उल्लू अ‍ॅपवर बंदी! कोण आहे त्याचा मालक, अश्लील व्हिडिओ बनवून कमावले शेकडो कोटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।।सरकारने सॉफ्ट पॉर्न दाखवणाऱ्या उल्लू अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सरकारने म्हटले की उल्लू आणि ऑल्‍ट बालाजी सारखे ॲप सरळ सरळ सॉफ्टपॉर्न दाखवत आहेत लहान मुलांपर्यंतही हे सहजपणे पोहचू शकते त्यामुळे याच्या गंभीरतेकडे लक्ष देत हे ॲप बंद केले जात आहे फक्त हे एक नाही तर बोल्ड कंटेंट दाखवणारे डझनभर ॲप बंद करण्यात आले आहेत.

हे अ‍ॅप 2018 मध्ये विभूति अग्रवाल याने बनवली होती जे आयआयटी कानपूरचे ग्रॅजुएट आहेत त्यांच वार्षिक उत्पन्न जवळपास 100 कोटी असल्याचे म्हंटले जात आहे. सरकारने अचानक डझनभरपेक्षा जास्त भारतीय ॲपबंदी घातली आहे यामध्ये बहुचर्चित उल्लू (ullu) ॲप देखील समाविष्ट आहे देशातल्या कोट्यवधी लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. उल्लू ॲपचा निर्माता तयांच्या कंपनीचा आयपीओ आणायच्या तयारीत असताच सरकारने अचानक त्यांना धक्का दिला. यामुळे त्यांच्या कंपनीचे मोठे नुकसान होणार आहे

कोण आहे उल्लू ॲपचा निर्माता?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पान उल्लू ॲप बनवणारा फिल्म डायरेक्टर किंवा प्रोड्यूसर नाही तर आयआयटीचा टॉपर आहे. आयआयटी कानपूर मधून बीटेक चे शिक्षण घेतलेल्या विभू अग्रवालने हे ॲप बनवले त्याला बिजनेस वर्ल्डचे चांगले ज्ञान होते त्यामध्ये चांगले यश मिळाल्या नंतर विभूतिने एंटरटेनमेंट फील्ड मध्ये लक आजमावले. पदवीनंतर विभू यांनी जपानमधून एमबीएचे शिक्षण घेतले आणि बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्समध्ये पीएचडी करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगला अनुभव घेऊन ते भारतात परतले.

त्याचा व्यावसायिक प्रवास आत्ताचा नाही तर 30 वर्षांपूर्वीच याची सुरुवात झाली होती. विभू अग्रवालने भारतात परतल्या नंतर लगेचच व्यवसाय जगतात प्रवेश केला आणि 1995 मध्ये जेप्को इंडिया त्यांची ही पहिली स्टील उत्पादन कंपनी सुरू केली. त्याला यात लवकर यश मिळाले आणि तो मनोरंजन, मीडियाकडे वळला.

2018 मध्ये उल्लू ॲप बनवले. या app चे 5 कोटीहूं जास्त सक्रिय वापरकर्ते आहेत आणि 11 कोटी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. याचे वार्षिक सब्स्क्रिप्शन 1 हजार रुपये आहे.

2024 या आर्थिक वर्षात या ॲपने 100 कोटी कमावले त्यानंतर 150 कोटीचा आयपीओ उभरणीची तयारी सुरू असतानाच सरकारने यावर बंदी घातली. बाल हक्क आयोगानेही या ॲपवर अनेकदा बंदीची मागणी केली होती

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *