मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी आणखी एक महामार्ग सेवेत येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। मुंबई- पुणेकरांसाठी एक महत्त्वाची समोर येत आहे. आता मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी आणखी एक महामार्ग सेवेत येणार आहे. द्रुतगती महामार्गाला समांतर आणखी एक द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळं मुंबई-पुणे तिसरा महामार्ग आता प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

मुंबई-पुणे-बंगळुरू असा 830 किमीचा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गंत मुंबई ते पुणे असा नवा द्रुतगली महामार्ग बांधला जाणार आहे. अटल सेतू जिथून संपतो तिथून हा महामार्ग सुरू होणार आहे. तर, पुढे पुणे वर्तुळकार रस्त्याला जोडून पुढे पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गाला मिळेल.

कसा असेल मार्ग?
अटल सेतू- चौक-पुणे, शिवारे असा हा मार्ग असणार आहे. हा संपूर्ण महामार्ग 130 किमीचा असणार आहे. तर उर्वरित 100 किमीच्या महामार्गाची तपासणी अभ्यासासह आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे अंतर तासांत पार होईल?
मुंबई ते पुणे अंतर केवळ दीड तासांत पार करता येणार आहे.

या नवीन महामार्गाची गरज का?
वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि तिसरी मुंबई यामुळं भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळंच द्रुतगती महामार्गाला समांतर आणखी एक द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती लोकसंख्येचा विचार करुन हा महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पुण्याला जोडणारा आणखी एक प्रकल्प
मुंबई पुण्याला जोडणारा आणखी एक प्रकल्प लवकरच सेवेत येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला पर्यायी रस्ता म्हणून मिसिंग लिंक लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम 94 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किमी लांबीचा हा पर्यायी रस्ता आहे. 2019 मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. या भागात डोंगरभाग मोठ्या प्रमाणात असून 130 मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रिटीकरण करण्याचे कामही सुरू होते. खोपोली येथून हा पर्यायी रस्ता सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *