![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑगस्ट ।। गेल्या दोन दिवसांपासून शहरासह घाट विभागातील पावसाचा जोर ओसरला आहे. रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांतदेखील हवामानात फार मोठा बदल होणार नसल्याने हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे आणि परिसरात मंगळवारी (ता. ५) कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस इतके, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे.
बुधवारी (ता. ६) कमाल तापमान स्थिर राहणार असून, त्यानंतर कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे.
कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार असून, आकाश अंशतः ढगाळ राहून अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
