EPFO New Rule: पहिली नोकरी असेल तर लगेच करा हे काम ; UAN च्या नियमांत केला बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ ऑगस्ट ।। कर्मचारी निर्वाह संघटन निधी म्हणजेच ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना उमंग अॅपवरुन यूएएन (Universal Account Number) अॅक्टिव्ह करणे अनिवार्य असणार आहे. याची सुरुवात आजपासून म्हणजेच ७ ऑगस्टपासून होणार आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, आता फक्त आधार फेस ऑथेंटिकेशन करुन तुम्ही उमंग अॅपवरुन यूएएन नंबर अॅक्टिव्हेट करु शकतात. जर तुम्ही यूएएन नंबर अॅक्टिव्हेट केला नाही तर तुमच्या सेवा बंद होणार आहेत.

उमंग अॅपवरुन करा UAN नंबर सक्रिय (UAN Activation Through Umang App)
ईपीएफओने काही नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ३० जुलै रोजी याबाबत सर्कुलर जारी केले होते. यानुसार, आता कर्मचाऱ्यांना आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशन करुन UAN नंबर सक्रिय करावा लागणार आहे. काही खास गोष्टींमध्ये आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल नंबर जनरेट करण्याचा जुनी पद्धतदेखील मान्य असणार आहे. परंतु आता नवीन यूएएन नंबरसाठी आधार फेस ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे. यासाठी संपूर्ण पद्धत ऑनलाइन होणार आहे.

ईपीएफओच्या या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना आता घसबसल्या उमंग अॅपवरुन यूएएन नंबर अॅक्टिव्हेट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला उमंग अॅप आणि आधार फेस आरडी अॅप डाउनलोड करावा लागणार आहे. यानंतर E_UAN कार्डची डिजिटल कॉपी डाउनलोड करु शकतात.

आता तुम्हाला ऑनलाइन यूएएन नंबर सक्रिय करण्यासाठी आधार कार्ड, रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. याचसोबत चेहऱ्याच्या स्कॅनिंगसाठी आधार फेस आरडी अॅप असणे गरजेचे आहे.

UAN नंबर कसा अॅक्टिव्ह करायचा? (How To Activate UAN Number)

तुम्हाला फोनमध्ये उमंग अॅप ओपन करायचा आहे. त्यानंतर EPFO वर जा.

यानंतर UAN allotment and activation सिलेक्ट करा.

यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर टाका आणि आधार कार्डचा नंबर टाका.

यानंतर ओटीपी पाठवा.

यानंतर फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल. त्यासाठी Aadhaar Face ID App डाउनलोड करा.

यानंतर जर तुम्हाला यूएएन नंबर मिळाला नाही तर तुम्ही UAN नंबर तयार करु शकतात.

यानंतर तुम्हाला यूएएन नंबर आणि पासवर्ड तुमच्या एसएमएसवर पाठवला जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *