Market Update: फळभाज्यांचे दर स्थिर, पालेभाज्यांच्या दरात वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 10) फळ भाज्यांची आवक वाढली आहे; मात्र भाज्यांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत, तर पालेभाज्यांचे दर वाढले असून, कोथिंबीरची जुडी 30 रुपये दराने विक्री केली जात होती.

रविवारी पिंपरी बाजारात पालेभाज्यांचे दर वाढले होते. गेल्या आठड्यात 10 रुपये दराने मिळाणार्‍या पालेभाज्या जुडी 20 रुपये दराने विक्री केली जात होती. टोमॅटोचे दर वाढलेले असून, प्रतिकिलो 50 रुपये दराने विक्री केली जात आहे. इतर फळभाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत.

कांदे आणि बटाटे यांचे भाव मात्र स्थिर आहेत. शंभर रुपयांना 4 किलो कांदे व बटाटे विक्री केली जात आहे. फळभाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीरची जुडी 30 रुपये तर पालेभाज्या 20 रुपये जुडी होत्या. हिरवी मिरची 80 रुपये किलो दर होता. फळभाज्यांमध्ये वांगी, दोडका, फ्लॉवर 60 – 80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

लसूण 100 – 140 रूपये किलो तर कांदा आणि बटाट्याचे दर शंभर रूपये 4 ते 5 किलो याप्रमाणे होते. टोमॅटो 50 रुपये प्रतिकिलो होते. आले 80 रुपये किलो आहे.

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे :
पिंपरी बाजारात गवार 100 – 120 रुपये किलो, शेवगा 80 रुपये किलो दराने विक्री केला जात होता. वाटाणा 100 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये, भेंडी 60 रुपये किलो, फ्लॉवर 60 रुपये, कोबी 40 रुपये, मिरची 90 रुपये, गाजर 50 रुपये, शिमला 80 रुपये, लसूण 80 – 100 रुपये, आले 80 रुपये, वांगी 60 रुपये, काकडी 30 रुपये, कारले 60, कांदे 100 रुपये 5 किलो, बटाटा 25 रुपये किलो, बिन्स 80 रुपये किलो, पावटा 60, रताळी 60 रुपये, लाल भोपळा 60 रुपये , घोसाळी 50, दोडका 80 रुपये, तोंडली 50 रुपये, बीट 40 रुपये, दुधी 50, घेवडा 60.

पिंपरी बाजारातील दर
पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी- कोथिंबीर 30, मेथी 20, पालक 20 , शेपू 20, पुदिना 10 रुपये, मुळा 20, चवळई 20, लाल माठ 20, कांदापात 20, करडई 20, आळू पाने 40 रुपये जुडी.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.) – बीट 80, वाल 60, दोडका 70, कारली 70, भरताची वांगी 60, गवार 130, शेवगा 80, भेंडी 80 ,मिरची 80, फ्लॉवर 80, कोबी 50, वांगी 60, तोंडली 60, घोसळे 60, पडवळ 60, भोपळा 60, पापडी 60 – 70, बीन्स 80, परवल 50, रताळी 70, सुरण 50, मद्रास काकडी 60, आरबी 70, सिमला 90, वाटाणा 100 – 120, राजमा 70 काळा, राजमा लाल 70.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 9, बटाटा 13, आले 50, भेंडी 30, गवार 60 , टोमॅटो 35, वाटाणा 75, घेवडा 50, दोडका 30, हिरवी मिरची 40, दुधी भोपळा 15, काकडी 20, कारली 50, गाजर 25, फ्लॉवर 50, कोबी 35, वांगी 50, ढोबळी 40, शेवगा 40, घोसाळी 25, पावटा 50, मिरची 50 प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 4203, पालेभाजी 44300 (गड्डी) , फळे आवक 285, कांदा 229, बटाटा 1320, आले 38, लसूण 0, भेंडी 171, गवार 39, टोमॅटो 473, वाटाणा 34, घेवडा 59, दोडका 30, हिरवी मिरची 114, दुधी भोपळा 67, काकडी 233, कारली 47, डांगर 49, गाजर 155, फ्लॉवर 229, कोबी 238, वांगी 226, ढोबळी 105, बीट 12, शेवगा 27, लिंबू 50, मका कणीस 116 क्विंटल अशी आवक झाली आहे.

सफरचंद, सीताफळाचे भाव घटले
पिंपरी फळ बाजारात फळांची आवक जास्त झाली असून दर देखील कमी झाले आहे. बाजारात सफरचंद व सीताफळांची आवक वाढली आहे. दोन्हीचे दर दीडशे रुपये प्रति किलो आहेत.

उपवासामुळे केळी महाग झाली आहेत. केळी 70 ते 80 रूपये डझन दराने विक्री केली जात आहे. बाजारात डाळींब 200 ते 250 रूपये किलो दराने उपलब्ध आहेत. तर पेरू 100 ते 150 रूपये किलो दराने उपलब्ध आहेत. बाजारात सिमला येथील नाश्पती, आलुबुखार आणि पिअर यांची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. इतर फळांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. पावसामुळे फळांच्या मागणीत देखील घट झाली आहे.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे :
देशी सफरचंद 150 – 160 रुपये तर परदेशी सफरचंद 240 रुपये, मोसंबी 100, संत्री 150, डाळिंब 200 – 250, पेरू 100 – 150 रुपये, पपई 60 – 70 रूपये, अननस 120 रुपये, केळी 80 रुपये डझन, अननस 100 प्रतिनग, पिअर 140 रुपये, ड्रॅगनफ—ुट पांढरे 100 रुपये (दीड किलो) , किवी 120, आंबे (तोतापुरी) 100 – 120 रुपये, नाश्पती 120 रुपये, आलुबुखार 150 रुपये, सीताफळ 100 – 150 रुपये.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *