महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आत्मविश्वास वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल. शेअर्स मधून लाभ संभवतो.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. तरुणांनी आळशीपणा करू नये. कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे. सामाजिक भान ठेवणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत. मनाची उदासीनता दूर सारावी. जोखीम घेताना सावध रहा. योग्य तर्क बांधावा लागेल. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope )
घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा. तरुणांना करियर विषयाची चिंता सतावेल. बौद्धिक ताण घेऊ नका. कामात तत्परता दाखवावी. बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाला वाटा फुटू शकतात. मौल्यवान वस्तु काळजीपूर्वक ठेवाव्यात.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कौटुंबिक गोष्टींचा प्राधान्याने विचार करा. तरुण वर्गाचे मत जाणून घ्या. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. दृष्टीकोनात बदल करून पहा. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
आपल्या मनाप्रमाणे वागणे ठेवाल. हेतु समजून प्रतिक्रिया द्यावी. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. हाताखालील लोकांवर फार अवलंबून राहू नका.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
जोडीदाराचे सौख्य वाढेल. गरजेनुसार काही बदल करून पहा. मनातील नसती चिंता बाजूस सारा. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. जुनी कामे सामोरी येतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
मनातील इच्छा पूर्ण होईल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. स्थावर व्यवहारातून लाभ होईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतील. वैवाहिक जीवनात आनंद वाटेल. सहकारी अपेक्षित मदत करतील. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
तोंडात साखर ठेवून बोलावे. आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका. काटकसरीवर भर द्यावा. जवळचे मित्र भेटतील. आहारावर नियंत्रण ठेवा.