ड्रीम इलेव्हन खेळाडूंचे पैसे परत करणार, कॅश गेम आणि स्पर्धा केल्या बंद; डिपॉझिट बॅलन्स सुरक्षित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने मांडलेल्या ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्यानंतर ड्रीम स्पोर्ट्सने त्यांच्या नवीन अॅप्स ड्रीम पिक्स आणि ड्रीम प्लेवर चालणाऱया सर्व पे टू प्ले स्पर्धा बंद केल्या आहेत. मात्र, सर्व खेळाडूंचे पैसे सुरक्षित असून ते ड्रीम 11 अॅपमधून कधीही काढता येतील असे पंपनीने स्पष्ट केले आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये पंपनीने 188 कोटी रुपयांचा नफा आणि 6 हजार 384 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. कॅश गेम आणि स्पर्धा या ड्रीम इलेव्हनमधून बंद करण्यात आले असून युजर्स जिंकलेले पैसे आणि डिपॉझिट बॅलन्स सुरक्षित आहे. ते कधीही काढता येईल असे पंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आता करोडो ड्रीम इलेव्हन युजर्स ड्रीम इलेव्हन कॅश कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत तसेच पैसेही लावू शकणार नाहीत. ड्रीम 11 चे जवळपास 28 कोटी युजर्स असून 9 हजार 600 कोटींच्या जवळपास महसूल आहे. देशातील टॉपच्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये ड्रीम इलेव्हनचा समावेश आहे.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले. देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योग 3.8 अब्ज डॉलरचा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योगाला मोठा फटका बसला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यापासून ड्रीम 11 आणि माय इलेव्हन सर्पलसारख्या फॅन्टसी गेमिंग अॅप्सनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिअल मनी गेम्स बंद केले आहेत. या कायद्यानुसार दोषींना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होणार आहे.

विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मांडले होते. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला आजअखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही मंजुरी मिळाली आहे. आता या ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणाऱया या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *