महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आठवड्याभरात गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात.परंतु आता सोन्याचे दर वाढल्याने सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे. सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे १,०९० रुपयांनी वाढले आहेत.
सोन्याच्या दरात वाढ (Gold Rate Hike)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०९० रुपयांनी वाढले आहे. आज प्रति तोळा सोन्याचे दर १,०१,६२० रुपये आहेत. काल हे दर १,००,५३० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८१,२९६ रुपये आहे. या दरात ८७२ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर १०,१६,२०० रुपये आहेत. या दरात १०,९०० रुपयांनी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)
२२ कॅरेट सोन्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज हे दर ९३,१५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ७४,५२० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १०,००० रुपयांनी वाढून ९,३१,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ७६,२१४ रुपये आहेत. या दरात ८१४ रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,९७१ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ८,१४० रुपयांनी वाढून ७,६२,१४० रुपये झाले आहेत.