Horoscope Today दि. ३१ ऑगस्ट ; आज सतर्क राहणे गरजेचे आहे.……..; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।।

मेष
स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आघाडीवर राहायचे असते. आज विशेषत्वाने तुमच्याकडून प्रयत्न होईल. विद्यार्थ्यांना यश आणि लाभ सहज प्राप्त होईल. क्रीडा क्षेत्रातील लोकांना प्रगती दिसते आहे.

वृषभ
व्यवसायामध्ये भरभराट होईल. महत्त्वाचे कार्य पार पडतील. घरामध्ये नवीन खरेदी होईल. संततीसाठी, आरोग्यासाठी विशेष खर्च आपल्याकडून होणारा आजचा दिवस आहे.

मिथुन
भावंड सौख्यांसाठी दिवस चांगला आहे. ज्यावेळी मदत हवी असते त्यावेळी आपलेच लोक सहज हात पुढे करतात. आपल्या पराक्रमाला बहर येईल. प्रवासातून फायदा संभवतो आहे.

कर्क
घरी पाहुण्यांची मांदियाळी राहील. त्यांची ऊठबस, आदरातिथ्यामध्ये दिवस व्यस्त राहील. धनाची आवक चांगली असल्यामुळे समाधानाची लहर येईल. तर सुग्रास भोजनामुळे तृप्तीची ढेकर येईल.

सिंह
आपण करत असलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल आरोग्य उत्तम राहील. सकारात्मकता वाढीला लागेल. नव्याने ओळखी होतील. दिवस चांगला आहे.

कन्या
आजच्या दिवसात तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. जवळच्याच व्यक्तींकडून त्रासाचे योग संभवत आहेत. प्रदेश प्रवास, मोठ्या काही गोष्टी आज अचानक घडतील किंवा त्यांचे निर्णय होतील. दिवस बरा आहे.

तूळ
आपल्या लोकांची साथ संगत चांगली असेल. सूनजावयांच्या प्रेमामुळे समाधान मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा आहे.दिवस उत्तम आहे.

वृश्चिक
काही वेळेला योग्य अयोग्य निर्णय घेण्यासाठी आपण निर्णय आधीच घेतलेले असतात. आज ठरवलेल्या गोष्टी तशाच होण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. कामासाठी प्रवास होतील. मात्र आपला हट्टीपणा आज संभाळणे गरजेचे आहे.

धनु
गुरु उपासना फलदायी ठरेल.लांबणीवर पडलेल्या गोष्टी आज सहज होताना दिसतील. यशाची द्वारे खुली होतील. दिवस पारमार्थिक योगासाठी आणि प्रगतीसाठी चांगला आहे.

मकर
अति मोहाबाई आणि लोभ केलेल्या गोष्टी आज आपल्यावरच उलटण्याची शक्यता आहे अचानक धनलाभ किंवा काळापैसा, काळेधंदे यापासून आज चार हात लांब राहिलेलेच बरे राहील. काळजी घ्या.

कुंभ
आपण आज जोडीने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. रेंगाळलेले विषय नव्याने मार्गी लागतील. काही वेळेला एखाद्या गोष्टीचा अधिक खल करण्यापेक्षा त्यावर कृती करणे जास्त गरजेचे आहे. हे आज समजेल. कोर्टाच्या कामात यश आहे.

मीन
रोग आजारांपासून अस स्वतःची काळजी घ्यावी लागेल. मानसिकता स्वस्थ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आपलेच लोक आपल्याला त्रासदायक ठरतील. हितशत्रूंचा त्रासही संभवतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *