महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑगस्ट ।।
मेष – आपल्या राशीला कायमच गणेश उपासना फलदायी असते. आज गणेश चतुर्थी आहे. काही गोष्टी आजच्या दिवसात सकारात्मक भर घालणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाला योग्य न्याय मिळेल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या नशिबाची चांगली साथ लाभणारआहे. अडकलेली कामं पूर्ण होतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळू शकणार आहे. कुठली तरी मोठी व्यवसायिक डील होण्याची शक्यता आहे. नवीन पार्टनरशिप्समुळे व्यवसाय वाढणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग खूपच सकारात्मक राहणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची दारं उघडणार आहे. समाजात तुमची प्रतिमा उंचावेल, मान-सन्मान मिळेल. मित्रांचं सहकार्य मिळाल्यामुळे मोठा फायदा होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि नवे उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकणार आहेत.
सिंह – पैसा भरून असलेले सुख आज द्विगुणीत होणार आहे. गणेशाच्या आगमनामुळे आज कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक राहील. धनयोग चांगले आहेत. सुवर्ण खरेदी होईल. संसारात एकमेकांच्या समजूतदारपणामुळे अनेक कामे हातात हात घालून कराल. ज्यात तुम्हाला विशेष यश मिळेल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अनुकूल घडणार आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकणार आहे. व्यवसायात नवे अवसर हाताशी येणार आहे. आपल्या ऊर्जेचा उपयोग मोठी ध्येयं साध्य करण्यासाठी करा. सामाजिक कार्यक्रमांत सहभाग घेतल्याने नवे संबंध आणि संधी मिळणार आहेत.
टीप : या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे