![]()
पतित पावन ने जपली गणेशोत्सवाची अस्था संघटनेच्या मागणीला यश
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। पुणे मनपा प्रशासनाने कात्रज कचरा डेपोतील गणेश मूर्ती विसर्जन हौद कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून पतित पावन संघटनेतर्फे या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या उपनगरातील कात्रज भागात गणेश मूर्तींचे विसर्जन कचरा डेपोत असलेल्या विसर्जन हौदात केले जात होते. श्रद्धा व आस्थेशी निगडीत असलेले गणेशोत्सवातील विसर्जन कचरा डेपोत होणे हे पुणे शहराच्या अस्मितेला अशोभनीय असल्याची बाब पतित पावन संघटनेच्या लक्षात आली.
याबाबत संघटनेचे श्री. गिरीष काकडे, श्री. प्रसाद वाईकर व श्री. अक्षय जम्बुरे यांनी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले होते. या निवेदनास मान्यता देत प्रशासनाने कचरा डेपोतील विसर्जन हौद कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबद्दल पतित पावन संघटनेतर्फे मनपा प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत. संघटना सदैव पुणेकरांच्या श्रद्धा व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहील.
