महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ सप्टेंबर ।। ३ सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची (GST Council) बैठक झाली. या ५६ व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामान यांनी जीएसटी बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा विचार करत फक्त दोन टॅक्स स्लॅबला (GST Tax Slab) मंजुरी दिली आहे. यावर बैठकीतील सर्व सदस्यांनी मंजुरी दिली आहे. हा नवीन टॅक्स स्लॅब २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अनेक जीवनावश्यक गोष्टी या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे महागाई थोड्याफार प्रमाणात कमी होईल. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे जीएसटीमधील १२ आणि २८ टक्के टॅक्स स्लॅब काढून टाकण्यात आला आहे. यामुळे या श्रेणीतील वस्तूंवर आता कमी टॅक्स लागणार आहे.
कोणत्या गोष्टी स्वस्त? (Which Items Cheaper)
या वस्तूंवर फक्त ५ टक्के टॅक्स (GST Tax Slab Reform These Items Have Only 5% Tax)
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे मध्यमवर्गीय लोकांना खूप फायदा होणार आहे. काही गोष्टींवर फक्त ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. यामध्ये शॅम्पू, तेल याचसोबत रोजच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. याचसोबत नमकीन पदार्थ, पास्ता, कॉफी, नूडल्स यावरील टॅक्स स्लॅब ५ टक्के करण्यात आला आहे. थर्मामीटर आणि ग्लूकोमीटरवर फक्त १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. चीज, बटरवरील टॅक्स १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे.
बाइकपासून ते सिमेंट या गोष्टी स्वस्त (Bike, Cement Price Cut)
२८ टक्के टॅक्स स्लॅबमधील अनेक गोष्टींना १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये सहभागी केले आहे. यामध्ये कार, फ्रीज, एसीचा समावेश आहे. यावरील कर १० टक्क्यांनी कमी केला आहे. याचसोबत सिमेंटवरील टॅक्स स्लॅब १० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. 350cc बाइक आणि ऑटो पार्ट्सच्या जीएसटीमध्येही कपात झाली आहे.