महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० सप्टेंबर | पिंपरी चिंचवड दिनांक 9 सप्टेंबर 2025 (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये पिंपरी चिंचवड सिटी न्यूज चे मुख्य संपादक तथा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख श्री युनूस खतीब यांना मानवतेच्या सेवेसाठीचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ईद-ए- मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, मिरवणुकांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकार युनूस खतीब गेली नऊ वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून मानव सेवेचे काम करत आहेत विविध समाजाच्या अडचणी शासन दरबारी मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात या संदर्भातील निकष पूर्ण करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष शहाबुद्धीने एम शेख यांनी माध्यमांना दिली.
पत्रकार नेहमी समाजाला आरसा दाखवण्याच काम करत असतो, आम्ही दरवर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतो,आज या पवित्र दिवशी आम्ही पत्रकार युनूस खतीब यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी दिलेले योगदान पाहता त्यांचा सन्मान केलेला आहे.
डॉ. कैलास एम कदम
अध्यक्ष – काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
युनूस खतीब यांच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला ही त्यांच्या कामाची पोहोच पावतीच आहे,पत्रकार संघाकडून खूप खूप शुभेच्छा.
बापूसाहेब गोरे
अध्यक्ष
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ.
सन्मानाने जबाबदारी वाढते, समाजासाठी केलेल्या कार्याची दखल समाज घेतच असतो, हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे.
पत्रकार युनूस खतीब