“शंभूराजांना ढोल-ताशात मानवंदना!”

Spread the love

Loading

स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणला राष्ट्रव्यापी अभिवादनाचा भव्य सोहळा, ३००० ढोल, १००० ताशांचा गजर

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० सप्टेंबर | पिंपरी-चिंचवड – हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी एक भव्य ऐतिहासिक सोहळा १४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. या वेळी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात उंच स्मारक – “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” या अभिमानास्पद संकल्पनेला वंदन करण्यात येणार आहे.

📍 स्थळ: स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी (पिंपरी चिंचवड)
🕒 वेळ: दुपारी ३ वाजता
📅 दिनांक: १४ सप्टेंबर २०२५

या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे:

🚩 ३००० हून अधिक ढोल

🚩 १००० पेक्षा जास्त ताशे

🚩 ५०० भगवे ध्वज

🚩 आणि आणखी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम

देशभरातील नामांकित ढोल-ताशा पथकांचा या कार्यक्रमात सहभाग असून, इतिहासात नोंद होईल असा हा भव्य सोहळा होणार आहे. शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि स्वराज्यविचारांनी भारलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत.

📞 नावनोंदणीसाठी संपर्क:
सागर गडसिंग – 9922520194

या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून धर्मवीरांची कीर्ती गगनात पोहोचवूया.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *