महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | सोनम वांगचुक यांच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान अटक झाल्यानंतर हेलमधील परिस्थिती आणखी चिघळलीय. लडाखमधील हिंसाचारग्रस्त लेह शहरात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. आज शनिवारी तीन दिवसांसाठी संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्यात आली. जुने शहर आणि नवीन भागात दुपारी चार तासांसाठी कर्फ्यू टप्प्याटप्प्याने हटवण्यात आला.
पोलीस आणि निमलष्करी दलांच्या उपस्थितीत लोक रांगेत उभे राहून जीवनावश्यक वस्तू खरेदी करत होते आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांग लावताना दिसले. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस महासंचालक एसडी सिंह जामवाल म्हणाले की, जुन्या शहरात दुपारी १ ते ३ आणि नवीन भागात दुपारी ३.३० ते ५.३० पर्यंत कर्प्यूमध्ये सूट देण्यात आली. दरम्यान कर्फ्यूमध्ये सूट देण्याचा निर्णय उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
बुधवारी लेह एपेक्स बॉडीने पुकारलेल्या बंददरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. लडाखला राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला होता.पण परिस्थिती झपाट्याने बिघडली. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि ९० हून अधिक जण जखमी झाले.
दरम्यान हिंसाचार होण्यास सोनम वांगचुक हे कारणीभूत असल्याचं म्हणत त्यांना अटक करण्यात आली. वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचं उघडकीस आलंय. मागील महिन्यात एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटला अटक करण्यात आली होती. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांचे व्हिडिओ त्याने पाकिस्तानात पाठवल्याचं समोर आलंय. वांगचुक यांचे परदेश प्रवास देखील संशयास्पद आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये द डॉनच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. ते बांगलादेशलाही गेले होते.
पोलीस प्रमुखांनी सांगितले की, परदेशी निधी आणि एफसीआरए उल्लंघनासाठी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहेय. वांगचुक यांनी केंद्र आणि लडाख प्रतिनिधींमधील चर्चा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान २५ सप्टेंबर रोजी एक अनौपचारिक बैठक नियोजित करण्यात आली होती. परंतु आदल्या दिवशी प्रक्षोभक व्हिडिओ आणि विधाने समोर आल्यानं हिंसाचार भडकला होता.