Rain News – पुढचे तीन दिवस धोक्याचे ! या जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | अहिल्यानगर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,९४० क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ९,४६५ क्युसेक, जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून ८२० क्यूसेक, निळवंडे धरणातून १,५२१क्यूसेक, ओझर बंधारा १,८८२ क्युसेक, मुळा धरणातून २,००० क्युसेक, घोड धरणातून ५,००० क्युसेक, सीना धरणातून ३,०७० क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ६०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ५५० क्युसेक, खैरी धरण येथून १३,२४३इतका विसर्ग सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *