कायद्याला धरून काम करणाऱ्या प्रत्येक माणूस आणि पोलिसांच्या मी सदैव पाठीशी ; कृष्ण प्रकाश यांची दणक्यात एंट्री!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. ६ सप्टेंबर – ‘शहरात ९९ टक्के लोक कायदा पाळतात परंतु, एक टक्का लोकांमुळे गुन्ह्यांना चालना मिळून ते घडविले जात आहेत. याप्रकारच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे कायदा सर्वांना सारखा असून, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही’, अशा शब्दांत पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बजावले. कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

पिंपरी चिंचवड शहराचा अभ्यास करून रूपरेषा ठरवली जाणार असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्याचे औद्योगिक आणि आयटी हब म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिले जाते. त्यामुळे येथील प्रश्न भिन्न असून, माथाडींच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी मोडून काढली जाणार आहे. पांढरपेशा लोक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून गुन्हे करीत आपला प्रभाव निर्माण करणारे असू शकतात. त्यामुळे या लोकांसाठी स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे. लोकांनी बेकायदेशीर उद्योग करू नयेत. या बाबींना माझ्यालेखी थारा नाही. कायद्याला धरून काम करणाऱ्या प्रत्येक माणूस आणि पोलिसांच्या मी सदैव पाठीशी असणार आहे, असेही कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले.

दिशाहीनतेमुळे काही बाल गुन्हेगार असू असतात. या सर्वांना आधी समजावण्याचा प्रयत्न करणार. तरीही ते गुन्हे करीत राहिले तर मग कारवाई करणार, असा इशारा आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला. समस्येचे कारण जाणून घेऊन कारवाईला सुरुवात करणार. महिला, वृद्ध, बालके यांच्यासाठी एनजीओ च्या मदतीने काम करणार आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्याकडून शहर आणि त्यांच्याही समस्या जाणून घेणार आहे. झीरो टॉलरन्स हे माझे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांसाठी आयुक्तांचा मोबाइल क्रमांक

नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांचा ८८०५०८११११ हा क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर फोन करण्याऐवजी मेसेज अथवा एसएमएस करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. एखादी गंभीर घटना आथवा बाका प्रसंग असल्यासच फोन करावा असे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *