महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १ ऑक्टोबर | परिवहन विभागाकडून पुरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा मोठा दिलासा देण्यात आला आहे. दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश दिले होते. दिवाळीच्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दरवर्षी प्रमाणे एसटीच्या तिकिट दरात 10 टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन ही भाडेवाढ रद्द करावी असं एकनाथ शिंदे यांनी सुचवलं होतं. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले आहेत.
दिवाळीच्या तोंडावर एसटीकडून कऱण्यात आलेली 10 टक्के भाडेवाढ रद्द करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मी यावेळी अपवाद केला पाहिजे असं सांगितलं. पूरपरस्थितीमुळे 10 टक्के भाडेवाढ रद्द करावी असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार आता ते परिपत्रक काढत आहेत. त्यानंतर भाडेवाढ रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल असं ते म्हणाले आहेत.
दरवर्षी एसटी महामंडळ दिवाळीआधी 10 टक्के दरवाढ करतं. पण सध्याची स्थिती लक्षात घेता एसटी दरवाढ रद्द झाली आहे.