महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर | येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ३० अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे दानापूर –सुपौल एक्सप्रेस बदललेल्या गाडी क्रमांकांसह धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार दि. ६, १३ व २० ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. ०१००४ साप्ताहिक विशेष गाडी रविवार दि. ५ . १२ व १९ ऑक्टोबर रोजी मडगाव येथून ४ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ६.२० वाजता पोहोचेल.
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेर्डी, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, वीलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत.
पनवेल चिपळूण पनवेल अनारक्षित विशेष ही गाडी दि. ३ ऑक्टो. ते २६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी पनवेल येथून १६.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी २१.५५ वाजता पोहोचेल. ०११६० अनारक्षित विशेष गाडी दि. ३ ऑक्टो. ते २६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी चिपळूण येथून ११.०५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाड्या अनारक्षित असतील आणि त्यासाठी तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतील.