महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ ऑक्टोबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल. सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावू शकाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल. नोकरीत बदल करू इच्छिणार्यांना चांगली संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. वरिष्ठांची मर्जी ओळखून कामे करा.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
स्पर्धेत यश मिळवाल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील. व्यवसायिकांना फायदा देणार्या संधी समोर यातील. आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. उगाचच चिडचिड करू नका.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्या येतील. आपले स्पष्ट मत मांडाल. धावपळ व दगदग वाढेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करून घ्या. प्रलंबित कामे मार्गी लावाल. बोलताना तारतम्य बाळगा. मित्राची भेट उपयुक्त ठरेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. कार्यालयीन सहकार्यांशी सलोखा ठेवावा. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
मानसिक स्वास्थ्य जपावे. धार्मिक भावना वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ संभवतो. कौटुंबिक जबाबदार्या पार पाडाल. भावंडांशी मतभेदाची शक्यता.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील. दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उदभवतील. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. नामस्मरण उपयुक्त ठरेल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल. औद्योगिक वाढ सुखकारक ठरेल.