Horoscope Today दि. १९ ऑक्टोबर ; आज तडजोडीला पर्याय नाही.……….……..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ ऑक्टोबर |

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
हस्तकलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
लोकांना नाव ठेवायला जागा देऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
घरासाठी नवीन खरेदी कराल. स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंददायक असेल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
व्यायामाचा कंटाळा करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *