महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ ऑक्टोबर | दिवाळीआधीच सोने-चांदीचे दर वाढताना दिसत आहे. सोन्यापेक्षा जास्त चांदी महाग होत आहेत. दरम्यान, आता चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज चांदीचे दर घसरले आहेत. चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून हजारो रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता चांदी खरेदीकडेही ग्राहकांनी पाठ फिरवली होती. परंतु आज चांदीचे दर घसरले आहे. १ किलोमागे चांदी ४००० रुपयांनी घसरली आहे.
चांदीचे दर मागच्या १० महिन्यात दुप्पट झाले आहे. काल चांदीचे दर किलोमागे २ लाखांच्या आसपास होते. आज हे दर कमी झाले आहे. दररोज चांदीच्या दरात हजारो रुपयांनी वाढ होत होती. आज दर घसरल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
आजचे चांदीचे दर वाचा (Today Silver Price)
आज चांदी प्रति किलोमागे ४००० रुपयांनी घसरली आहे. आज चांदीचे दर १,८५,००० रुपये आहेत. १० ग्रॅममागे ४० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,८५० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर १८,५००रुपये आहेत. या दरात ४०० रुपयांनी घसरण झाली आहे.
सणासुदीच्या काळात सोने-चांदीचे वस्तू घेणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण दागिने करतात. मात्र, सध्या सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याने ग्राहकांना मोठा प्रश्न पडला आहे. सोन्यापाठोपाठ चांदी खरेदीकडेही ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, हे दर अजून कमी व्हावेत, अशी इच्छा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
सोनं महागलं
चांदीचे दर जरी कमी होत असले तरीही सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. सोन्याचे दर आजही वाढले आहे. प्रति तोळ्यामागे ३,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याने आतापर्यंतचे सर्वाधिक भाव गाठले आहेत. सोन्याचे दर १,३२,००० रुपये आहेत.