![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ ऑक्टोबर २०२५ | दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयामुळे जैन समाजात नाराजी पसरली आहे. या बंदीविरोधात जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मुंबई महापालिकेने स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या कारणामुळे दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला जैन समाजाचा विरोध आहे. कबुतरांना दाणे खाऊ घालणे ही जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वाशी निगडित धार्मिक परंपरा असल्याचे समाजातील प्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे कबुतरखाना हे एक ठिकाण नसून जैन समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याचा त्यांचा दावा आहे.
