Baba Vanga 2026 Prediction : भयंकर इशारा! पूर्वेत युद्ध, नव्या नेत्याचा उदय आणि सोन्याच्या भावात जबरदस्त बदल

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ ऑक्टोबर २०२५ | सततचं युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आता जगभरात 2026 साठीच्या भाकितांची चर्चा रंगू लागली आहे. बुल्गारियातील भविष्यवेत्त्या बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

🌏 पूर्वेकडून उठणार युद्धाचं वादळ
बाबा वांगांनी आपल्या भाकितात म्हटलं आहे — “पूर्वेकडून एक वादळ उठेल आणि पश्चिमेला राख करेल.”
तज्ज्ञांच्या मते, या वाक्याचा अर्थ पूर्वेकडे मोठं युद्ध भडकू शकतं असा घेतला जातोय. हे युद्ध केवळ एका देशापुरतं मर्यादित न राहता जागतिक पातळीवर पसरेल, असं अंदाज वर्तवला जातोय. या युद्धानंतर एका नव्या आणि शक्तिशाली नेत्याचा उदय होईल — “राख आणि रक्तातून उठलेला नेता” — जो जगाचं भवितव्य ठरवेल.

🌋 निसर्गाचा कोप आणि पृथ्वीचा बदल
2026 मध्ये भूकंप, ज्वालामुखी आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा तडाखा बसू शकतो. जगाचा नकाशाच बदलण्याइतकी विध्वंसक परिस्थिती निर्माण होईल, असा बाबा वेंगांचा इशारा आहे. पृथ्वीचा दहावा भाग कायमचा पाण्याखाली जाऊ शकतो, असंही भाकीत आहे.

🇮🇳 भारतावरही संकटाची छाया
भारतामध्ये पुन्हा एकदा पूर, भूस्खलन आणि तापमानवाढीचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली आहे. देशभरात आंदोलनं, राजकीय तणाव आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं.

🤖 आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका
बाबा वांगांच्या मते, 2027 पर्यंत जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं गुलाम बनेल.
मानव स्वतःला ‘सुपरह्युमन’ समजेल, पण या तंत्रज्ञानातून नवे आजार आणि जैविक धोकेही उद्भवतील. काही तज्ज्ञांनी तर याला “AI चं जैविक युद्ध” असं संबोधलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *