HSRP Update: एक कोटी वाहनधारक अजूनही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’पासून वंचित!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ नोव्हेंबर २०२५ | राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत एकूण ८६ लाख ३ हजार वाहनधारकांनी अर्ज दाखल केले, तर ६८ लाख २४ हजार वाहनांवर प्लेट बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे.

🔸 मात्र अजूनही एक कोटीहून अधिक वाहनधारकांनी (सुमारे १.१३ कोटी) HSRP बसवायचं बाकी आहे. परिवहन विभागाने दिलेल्या ३० नोव्हेंबर २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे, अन्यथा दंड टाळता येणार नाही.

🚗 काय आहे HSRP योजना?

२०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या प्लेट्समध्ये विशेष लसनी कोड, छेडछाड-प्रतिरोधक रिव्हेट्स आणि यूनीक सीरियल नंबर असतो, ज्यामुळे वाहनचोरी आणि बनावट नंबरप्लेट रोखण्यास मदत होते.

💰 HSRP किंमत:

HSRP ची किंमत वाहनाच्या प्रकारावर आणि नंबरप्लेटच्या आकारावर अवलंबून बदलते.
पेमेंट आणि अपॉइंटमेंटसाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच नोंदणी करावी लागते. शुल्क भरल्यानंतर ऑनलाइन स्लॉट बुकिंग करून जवळच्या फिटमेंट सेंटरला भेट देता येते.

🗓️ झोननुसार HSRP बसवण्याचं काम:

परिवहन विभागानं राज्य तीन झोनमध्ये विभागलं आहे —

🔹 झोन १: बोरिवली, ठाणे, पनवेल, पुणे, कोल्हापूरसह १२ आरटीओ
🔹 झोन २: मुंबई सेंट्रल, कल्याण, पेण, रत्नागिरी, सातारा आदी १६ आरटीओ
🔹 झोन ३: वडाळा, वाशी, सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, कऱ्हाडसह २७ आरटीओ

⚠️ महत्त्वाचं:

अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५

या तारखेनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होईल.
वाहनधारकांनी विलंब न करता नोंदणी पूर्ण करावी, असं परिवहन विभागाचं आवाहन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *