8
![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ नोव्हेंबर २०२५ | देशातील गरजू आणि अल्पउत्पन्न कुटुंबांसाठी सरकारकडून स्वस्त दरात धान्य मिळवण्याची सुविधा दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड असणे अनिवार्य आहे. पूर्वी या कार्डासाठी सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत असले, तरी आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ झाली आहे.
केंद्र सरकारने नागरिकांसाठी एक मोठी सोय उपलब्ध करून दिली असून, आता घरबसल्या मोबाईलवरूनच राशन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.
🔹 UMANG अॅपद्वारे करा अर्ज
-
आपल्या मोबाईलमध्ये UMANG अॅप डाउनलोड करा.
-
हे अॅप Google Play Store (Android) आणि Apple Store (iPhone) वर मोफत उपलब्ध आहे.
-
अॅप इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबरने नोंदणी (रजिस्ट्रेशन) करा.
-
त्यानंतर दिलेल्या सूचनांनुसार राशन कार्ड अर्जाचा फॉर्म भरता येईल.
या अॅपमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे चकरा न मारता, काही क्लिकमध्येच सेवा मिळणार आहे.
सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे वेळेची बचत, पारदर्शकता आणि गरजूंपर्यंत सुविधेचा जलद लाभ मिळणार आहे. लवकरच ही व्यवस्था देशभरात पूर्णपणे लागू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
