![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ नोव्हेंबर २०२५ | दिवाळीनंतर सोन्याच्या बाजारात पुन्हा तेजी दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले, तर चांदीच्या भावातही चांगली उडी पाहायला मिळाली आहे.गुड रिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर १७० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याचा १५० रुपयांनी, आणि १८ कॅरेट सोन्याचा १३० रुपयांनी वाढला आहे.
🔹 आजचे सोन्याचे दर (३ नोव्हेंबर २०२५):
२४ कॅरेट (१ तोळा): ₹१,२३,१७० (वाढ ₹१७०)
२२ कॅरेट (१ तोळा): ₹१,१२,९०० (वाढ ₹१५०)
१८ कॅरेट (१ तोळा): ₹९२,३८० (वाढ ₹१३०)
🔹 १० तोळा सोन्याचे दर:
२४ कॅरेट – ₹१२,३१,७००
२२ कॅरेट – ₹११,२९,०००
१८ कॅरेट – ₹९,२३,८००
दरवाढ जरी किरकोळ असली तरी ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे, कारण सलग काही दिवसांपासून बाजारात वाढीचा कल कायम आहे.
🌙 चांदीही झाली महाग:
चांदीच्या दरात प्रति किलो ₹२,००० ची वाढ झाली असून, आज १ किलो चांदीचा दर ₹१,५४,००० झाला आहे. तर १ ग्रॅम चांदीसाठी ₹१५४ रुपये मोजावे लागतील. विशेष म्हणजे, दिवाळीनंतरही सोनं-चांदीत वाढीचा ट्रेंड कायम असल्याने, आगामी काळातही दर आणखी चढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
