![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ नोव्हेंबर २०२५ | राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही यशस्वी ठरली असली, तरी मागील काही दिवसांपासून लाभार्थी महिला हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबर महिना संपला, नोव्हेंबरची सुरुवात झाली, तरीही अनेकांच्या बँक खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे बहिणींकडून आता प्रश्न विचारला जात आहे — “ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का?”
सरकारने योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्याची तरतूद केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे काही लाभार्थींचे हप्ते थांबले आहेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की केवायसी पूर्ण केल्यानंतरच पुढील हप्ते जमा होतील.
दरम्यान, दिवाळी आणि भाऊबीज सण संपून गेले असले तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत. सूत्रांनुसार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारकडून हप्त्याचे वितरण पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
💬 महत्त्वाची सूचना:
ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा त्यांच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत.
