अंबालात आज राफेलचा हवाई दलात समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १० सप्टेंबर – गुरूवारी आज जाहिररित्या भारतीय वायसुनेते राफेल या लढाऊ विमानाचा समावेश होणार आहे. अंबाला हवाई तळवार राफेलच्या पहिल्या तुकडीचा औपचारिकरित्या समावेश होणार आहे. पारंपरिक पद्धतीने ‘सर्व धर्म पूजा’ करून यांचा समावेश केला जाणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाला अंबाला एअरफोर्स स्टेशनसोबतच कँट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फ्रान्सच्या ‘दसॉल्त अ‍ॅव्हिएशन’ कंपनीने तयार केलेली राफेल लढाऊ विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले यांसाठी प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *