Pune : पुण्यातील अपघाताची मालिका थांबणार? नवले पुलाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ नोव्हेंबर २०२५ | पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने कंटेनर पुढे असलेल्या गाड्यांना धडकला. या भीषण अपघातानंतर एका गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. नवले पूल येथे झालेल्या भीषण अपघातानंतर पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्‍यांची समन्वयाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात घडला. या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा या पुलावरचा हा पहिलाच अपघात नसून यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत. या पुलावरील असलेल्या तीव्र उतारामुळे आणि मोठ्या अवजड वाहनांची सततच्या येण्याजाण्यामुळे हे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान गुरुवारी घडलेला अपघात हा भीषण होता या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्‍यांची समन्वयाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पुन्हा एकदा दिर्घकालीन, मध्यमकालीन आणि अल्पकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आहे.यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर रम्बलर्स स्ट्रीप, कॅटआय लावण्यास उशीर होऊ नये यासाठी हे काम स्वतः महापालिकेने करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज सकाळी नवले पूल परिसरात पाहणी केली. त्यानंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा आहेत उपाययोजना
– महामार्गावर ५ मिमी, १० मिमी, १५ मिमीचे रम्बलर्स स्ट्रीप लावणे
– ठिकठिकाणी एलइडी बोर्ड लावणे
– अवजड वाहनांनी सक्तीने रस्त्याची बाजू वापरावी, त्यामुळे सर्व्हिस रस्त्यापासून ही वाहने लांब राहतील.
– नो पार्किंगच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणे
– कात्रज ते नवले पूल या दरम्यान वाहनांचा वेग ४० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचे बंधन
– भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे
– नवले पूल व परिसरातील अवैध वाहतुकीवर निर्बंध आणणे
– महामार्गावर थांबणाऱ्या प्रवासी गाड्यांवर कारवाई करणे

सहा महिन्यात होणार ‘हे’ सेवा रस्ते
– सूस खिंड ते राधा हॉटेल
– डुक्कर खिंड ते मुठा नदी
– वडगाव पूल ते नवले पूल
– नवले पूल ते भुमकर पूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *