✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ नोव्हेंबर २०२५ | केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचं विधान काय… आणि राज्यभर पेटलेलं राजकारण काय…या सगळ्याची सूत्रं एका वाक्यातच दडलेली— “आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई केलं नाही, हे चांगलं!”
आणि हेच वाक्य राज ठाकरेंना चुकलं नाही.मनसे अध्यक्षांनी थेट सोशल मीडियावरून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे—सरकारच्या मानसिकतेवर चढवलेला थेट प्रहार!राज ठाकरेंचा आरोप : “जुनाट मळमळ पुन्हा वर आली!”
राज ठाकरेंनी जितेंद्र सिंह यांचे विधान उचलून धरत साधा प्रश्न विचारला—मुंबई महाराष्ट्रातच राहिली, हे काहींच्या पोटात अजूनही का दुखतंय?
त्यांच्या म्हणण्यानुसार—
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचे डाव इतिहासात अनेकदा उधळून लावले.आणि त्या पराभवाची मळमळ काहींच्या मनात आजही शिल्लक आहे.आता तीच पुन्हा वर काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “जम्मूचे मंत्री, मुंबईशी काही देणंघेणं नाही… पण वरिष्ठांना खूष करायचं!” जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी… पण ‘वरिष्ठांचे मन जाणून’ बोलण्याचा हा प्रकार असल्याचं राज ठाकरेंनी तिखटपणे म्हटलं.
त्यातल्या त्यांच्या सर्वात जोरदार टिप्पणीची झळाळी अशी—“यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं… कारण ते मुंबा देवीवरून आलंय.आणि त्या देवीची लेकरं म्हणजे आपण—मराठी माणसं!हीच खरी बोच त्यांच्या मनाला आहे.”
‘बाँबे’ नावातून मुंबईवर डाव? – राज ठाकरेंचा थेट इशारा राज ठाकरेंनी पंजाबच्या चंदीगढ प्रकरणाचा संदर्भ देत गंभीर दावा केला— केंद्राने महाराष्ट्रातही तसाच काही डाव शिजवला असण्याची 100% शक्यता आहे!
https://www.facebook.com/RajThackeray/posts/1397531475067085?ref=embed_post
त्यांच्या शब्दांत—
“मुंबई नको, ‘बाँबे’च हवं” हे म्हणणं म्हणजे शहरावर अप्रत्यक्ष ताबा मिळवण्याचा प्रयत्न आधी मुंबई, मग संपूर्ण एमएमआर गुजरातकडे वळवण्याची तयारी!
राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन
पोस्टच्या शेवटी राज ठाकरेंनी मराठी जनतेला थेट हाक दिली—“जागं व्हा! केंद्रीय हस्तक, उद्योगपती, मोठेमोठे गट— सगळे या शहराचा ताबा घेण्यास उतावीळ आहेत. आतातरी मराठी माणसांनी डोळे उघडले पाहिजेत!”
