रेल्वेचा नवीन नियम लागू : खिडकीवर तिकीट घेतानाही लागणार ओटीपी; तात्काळ बुकिंग प्रक्रिया आणखी पारदर्शक

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बदल अमलात आणला आहे. आतापर्यंत ऑनलाइन तिकीटांसाठीच लागू असलेला ओटीपी पडताळणीचा नियम आता आरक्षण खिडकीवरून घेतल्या जाणाऱ्या तात्काळ तिकिटांनाही लागू केला आहे. या निर्णयामुळे तात्काळ बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

🔹 खिडकीवर तिकीट घेताना प्रक्रिया कशी असेल?

प्रवाशाने आरक्षण फॉर्ममध्ये स्वतःचा मोबाईल नंबर द्यावा लागेल.
तिकीट बुकिंगच्या वेळी त्या क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
प्रवाशाने हा ओटीपी काउंटरवर सांगितल्याशिवाय तिकीट निश्चित होणार नाही.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन व्यवस्था १७ नोव्हेंबर २०२५ पासून प्रयोगरूपाने काही गाड्यांमध्ये लागू करण्यात आली होती. यशस्वी चाचणीनंतर आता ५२ ट्रेनमध्ये ही प्रणाली सुरू झाली असून देशभरात पूर्णपणे लागू करण्याची तयारी सुरू आहे.

🔸 या नियमाचे टप्प्याटप्प्याने झालेले बदल
जुलै २०२५
ऑनलाइन तात्काळ तिकिटांसाठी आधार आधारित पडताळणी सुरू.

ऑक्टोबर २०२५
सामान्य ऑनलाइन तिकीटांच्या पहिल्या दिवशी बुकिंगवर ओटीपी आधारित नियम लागू.

२८ ऑक्टोबर २०२५
आयआरसीटीसीद्वारे सकाळी ८ ते १० वाजेच्या गर्दीच्या वेळेत

आधार प्रमाणीकरण अनिवार्य.
या वेळेत तिकीट घेण्यासाठी आधार पडताळणी पूर्ण असणे आवश्यक.

🔹 या निर्णयाचे फायदे

दलालांची गैरव्यवहार करण्याची शक्यता कमी
तिकीट मिळवताना होणारी धांदल व गोंधळ घट
अतिगर्दीच्या वेळेत ‘खऱ्या’ वापरकर्त्यांना प्राधान्य
तात्काळ बुकिंग प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सुरक्षित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *