![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि.२२ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
वडिलधाऱ्यांच्या आज्ञेचे पालन कराल. जमिनीच्या व्यवहारातून फायदा संभवतो. शेतमालातून चांगले उत्पन्न मिळेल. व्यवसायात नवीन शिकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
पुढारीपणाचा मान मिळेल. बुद्धीकौशल्यावर कामे कराल. भावंडांची मदत होईल. कामातील बदल अनुकूल ठरेल. प्रवासाची मजा घ्याल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
घरातील कामात सढळ हाताने मदत कराल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. योग्य कामासाठी खर्च कराल. घरगुती वातावरणात रममाण व्हाल. आवडीच्या गोष्टी मिळतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
कलेत यश मिळेल. ध्यानधारणा कराल. मानसिक दुर्बलता टाळावी लागेल. हौस पूर्ण करण्यावर भर द्याल. गप्पांमध्ये रमून जाल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
करमणुकीवर खर्च कराल. प्रवासात दिवस जाईल. वादविवादात अडकू नका. रागराग करू नका. संयमाची जोड घ्यावी.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
इतरांशी स्पर्धा कराल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. समाजविरोधी कामात अडकू नये. भांडणात अडकू नका. मोठ्या व्यक्ती भेटतील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कामाचा वेळ इतरत्र वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. सरकारी कामात अडकून पडाल. कलेकडे अधिक लक्ष द्यावे. लेखनाला उठाव मिळेल. स्थावरची कामे निघतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
कामाला जोम येईल. आध्यात्मिक विचार मांडाल. काही बदलांना सामोरे जाल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. मदत करतांना मागेपुढे पाहणार नाही.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
भावंडांशी जुळवून घ्यावे. लिखाणाला बळ लाभेल. चिकाटी सोडून चालणार नाही. सर्वदूर विचार करावा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
कामात पत्नीची साथ लाभेल. कौटुंबिक वातावरणात रमाल. वैवाहिक सौख्य जपावे. ओळखीचा फायदा करू घ्यावा. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
जोडीदाराशी खटके उडणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाठीचे त्रास संभवतात. सामाजिक भान ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवून वागावे.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. स्वतंत्र मतावर भर द्याल. हट्टीपणा कमी करावा लागेल. मुलांचे प्रश्न समजून घ्यावेत. खेळात रमून जाल.
