“ दिनांक 8 मार्च आरोग्याची पहाट! महिला दिनी ‘स्त्रीकेअर’चे भव्य उद्घाटन; वीर हॉस्पिटलमध्ये स्त्रीआरोग्याचा नवा अध्याय सुरू होणार”

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ मार्च २०२६ ।। पिंपरी-चिंचवड शहरात महिला आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाची घडामोड घडणार असून, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत “स्त्रीcare Women’s Health & Wellness Centre” चे भव्य उद्घाटन येत्या रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी 10 वाजता काळेवाडी येथील Veer Hospital येथे होणार आहे. ‘स्त्रीच्या आरोग्यातूनच कुटुंबाचा आणि समाजाचा विकास’ या विचारातून उभारलेले हे केंद्र महिलांसाठी एक विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक आरोग्य व्यासपीठ ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याबाबत परिसरात उत्सुकता असून, महिला दिनी महिलांसाठीच ही आरोग्यभेट मिळणार असल्याने अपेक्षा दुणावल्या आहेत.

स्त्रीकेअर वुमेन्स हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरमध्ये स्त्रीरोग, गर्भारपणाची काळजी, प्रतिबंधात्मक तपासण्या, समुपदेशन तसेच महिलांच्या दैनंदिन आरोग्य समस्या लक्षात घेऊन आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येथे कार्यरत असलेले उच्चशिक्षित तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर महिलांच्या आरोग्याकडे केवळ वैद्यकीय नव्हे तर संवेदनशील दृष्टिकोनातून पाहणार आहेत. “रुग्ण म्हणजे फाईल नाही, तर कुटुंबातील सदस्य” या भावनेतून सेवा देणारा खेळकर, हसतमुख आणि शिस्तबद्ध स्टाफ हे या केंद्राचे खास वैशिष्ट्य असणार आहे. त्यामुळे उपचारांसोबतच मानसिक दिलासाही मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याच संकुलात कार्यरत असलेले व्ही आय व्ही एफ सेंटर अपत्यप्राप्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दांपत्यांसाठी आशेचे नवे दालन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध उपचार प्रक्रिया आणि अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन यामुळे हे केंद्र अल्पावधीतच विश्वासाचे केंद्र बनले आहे. राहुल वीर सर यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीम रुग्णसेवेसाठी सज्ज असते, शिस्त, पारदर्शकता आणि आपुलकी या त्रिसूत्रीवर आधारित सेवा देण्याची कार्यपद्धती आहे.

स्त्रीकेअरच्या उद्घाटनामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील महिलांना आता उपचारासाठी दूर धाव घ्यावी लागणार नाही. महिला दिनी होणारा हा उद्घाटन सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून, तो महिलांच्या आरोग्याबाबतच्या सामाजिक जाणीवेचा जाहीरनामा ठरणार आहे. — “स्त्री निरोगी तर घर समृद्ध, आणि घर समृद्ध तर समाज समर्थ!” अशा या आरोग्यक्रांतीची पहाट पाहण्यासाठी शहर उत्सुकतेने वाट पाहत आहे. 🌸

स्त्रीकेअरच्या मुख्य सेवा (Our Core Services)

* मातृत्व आणि गर्भधारणा निगा (Maternity & Pregnancy Care)
* प्रसूतीपूर्व फिजिओथेरपी (Antenatal physiotherapy)
* प्रसूतीनंतर रिकव्हरी आणि पुनर्वसन (Postpartum recovery & rehabilitation)
* PCOS आणि वजन व्यवस्थापन (PCOS & Weight Management)
* हार्मोनल संतुलन व्यायाम पद्धती (Hormonal balance exercise protocols)
* जीवनशैली आणि चयापचय सहाय्य (Lifestyle and metabolic health support)
* मासिक पाळी आरोग्य आणि निगा (Menstrual Health & Period Care)
* वेदना व्यवस्थापन (Pain management)
* मासिक पाळी आरोग्य शिक्षण (Cycle health education)
* पौगंडावस्था आणि किशोरवयीन आरोग्य (Puberty & Adolescent Wellness)
* शरीर जागरूकता शिक्षण (Body awareness education)
* तरुण मुलींच्या आरोग्यासाठी सहाय्य (Young girls’ health support)
* गर्भधारणेपूर्वीचे नियोजन (Pre-Conception Optimization)
* निरोगी गर्भधारणेसाठी शरीराची पूर्वतयारी (Preparing the body for healthy pregnancy)
* पेल्विक आणि कोअर स्ट्रेंथ प्रोग्राम (Pelvic & core strength programs)
* महिला कर्करोग पुनर्वसन (Women’s Cancer Rehabilitation)
* शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन (Post-surgery rehabilitation)
* लिम्फेडेमा आणि रिकव्हरी सहाय्य (Lymphedema & recovery support)

विशेष महिला आरोग्य सेवा (Specialized Women’s Care)

* प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सहाय्य (Fertility Enhancing Support)
* एंडोमेट्रिओसिस आणि तीव्र ओटीपोटात दुखणे व्यवस्थापन (Endometriosis & Chronic Pelvic Pain Management)
* पेल्विक फ्लोअर आणि लैंगिक आरोग्य थेरपी (Pelvic Floor & Sexual Wellness Therapy)
* मध्यवय आणि रजोनिवृत्ती आरोग्य कार्यक्रम (Midlife & Menopause Health Programs)
* महिलांचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य (Women’s Cardiovascular Fitness)
* कॉर्पोरेट महिला आरोग्य कार्यक्रम (Corporate Women’s Wellness Programs)

स्त्रीकेअर (StreeCare) का निवडावे?

* पुराव्यावर आधारित महिलांची फिजिओथेरपी (Evidence-based women’s physiotherapy)
* सुरक्षित आणि खाजगी उपचार वातावरण (Safe and private care environment)
* विशेष पेल्विक आरोग्य कार्यक्रम (Specialized pelvic health programs)
* परवडणारे स्ट्रक्चर्ड उपचार प्लॅन (Affordable structured treatment plans)
* जागरूकता, प्रतिबंध आणि दीर्घकालीन आरोग्यावर लक्ष (Focus on awareness, prevention and long-term health)

पहिले कन्सल्टेशन मोफत (First Consultation Free)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *