![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ मार्च २०२६ ।। Pune : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी पुणेकरांना उन्हाचा चटका जाणवत असून उकाड्यातही वाढ झाली आहे.
मात्र पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता India Meteorological Department ने वर्तविली आहे.
शहर आणि परिसरात शनिवारी (ता. ७) कमाल आणि किमान तापमान स्थिर होते. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे दुपारी घराबाहेर पडताना नागरिकांना कडक उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुन्हा कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
**Pune आणि परिसरात रविवारी (ता. ८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असल्याचे India Meteorological Department कडून सांगण्यात आले आहे. ☀️🌡️
