![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
कौटुंबिक सौख्यात रमाल. गरज नसतांना प्रवास करावा लागू शकतो. लहान मुलांच्यात रमून जाल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
ऐक्याची भावना जोपासाल. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. थोरांशी सल्ला-मसलत कराल. कामात चंचलता येईल. तोंडात साखर ठेवून बोलाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
मोकळेपणाने बोलणे टाळाल. पत्नीचा प्रेमळ सहवास मिळेल. झोपेची तक्रार दूर होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. मानसिक संभ्रम दूर करावा.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
उगाचच चंचलता वाढेल. फार विचार करत बसू नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्याल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. जुने विचार मनातून काढून टाकावेत.
सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
कलेसाठी अधिक वेळ काढाल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामात स्थिरता ठेवावी. गप्पांमध्ये वेळ घालवाल. पोटाची काळजी घ्यावी.
कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
कामात जोडीदाराचा हातभार लागेल. प्रगतीची नवीन संधी उपलब्ध होईल. मुलांना नवीन गोष्टी शिकवाल. व्यायामाचे महत्व लक्षात घ्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल.
तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
काही कामे कमी श्रमात पार पडतील. घरातील वातावरण अस्वस्थ वाटू शकते. नवीन गोष्टी आमलात आणताना विचार करावा. अचानक धनलाभ संभवतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
गरज नसेल तर प्रवास टाळावा. जोडीदाराचे सौख्य वाढेल. नवीन गोष्टींकडे कल वाढेल. मोहाळा बळी पडू नका. जवळचे मित्र भेटतील.
धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
कौटुंबिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. कामाचा आनंद घ्याल. लोकोपवादाला बळी पडू नका. जुन्या कामात प्रगती कराल.
मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
मानसिक ताण जाणवू शकतो. सतत बडबड कराल. कमिशनचा विचार आधी कराल. आवडते पुस्तक वाचाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
तुमच्या स्मरणशक्तीचे कौतुक केले जाईल. घरातील साफसफाई कराल. काही सकारात्मक बदल कराल. आवडता छंद जोपासाल. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका.
मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
उगाचच थकवा जाणवेल. सकारात्मक विचार करावेत. हस्तकलेत मन रमवावे. लबाड लोकांचा संग टाळावा. खोट्याचा आधार घेऊ नका.