Horoscope Today दि. २३ एप्रिल २०२६ ; आज धैर्य व चिकाटी सोडू नका…..… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडीवर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.

तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.

मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.

मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *