नाका-तोंडातील कोरोना नष्ट करते का आयोडिन?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – वॉशिंग्टन – दि. २२ सप्टेंबर – : अमेरिकेतील संशोधकांनी आयोडिनच्या माध्यमातून कोरोना विषाणू नष्ट करता येऊ शकतो, असा दावा केला आहे. नाक आणि तोंडाला आयोडिनने स्वच्छ केले तर कोरोनाला शरीरात संक्रमित होण्यापासून रोखता येऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. आयोडिनमुळे कोरोना विषाणू अवघ्या पंधरा सेकंदांमध्येच नष्ट होतो असा त्यांचा दावा आहे.

अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिन’ मधील संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की 0.5 टक्के प्रमाणाचे आयोडिन सोल्युशन ज्यावेळी कोरोना विषाणूवर सोडले जाते त्यावेळी तो पंधरा सेकंदांमध्येच नष्ट होतो. आयोडिनने सफाई केल्यावर विषाणूपासून बचाव करता येऊ शकेल व कोरोनाला फुफ्फुसापर्यंत जाण्यापासून रोखता येईल. त्यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर होणार नाही. माणसाच्या नाकात सर्वाधिक ‘एसीई 2’ रिसेप्टर्स असतात. पेशींच्या या रिसेप्टरनाच विषाणूचे काटेरी स्पाईक प्रोटिन घट्ट धरून ठेवतात व आपली संख्या वाढवतात. बहुतांश वेळी कोरोना विषाणूचे संक्रमण नाक किंवा तोंडाच्या माध्यमातूनच होते. विषाणूला तिथेच रोखण्यासाठी क्‍लिनिकल ट्रायलमध्ये नाक आणि तोंडाच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यावेळी असे आढळले की आयोडिनचे 0.5 टक्के प्रमाण असलेले अँटिसेप्टिक सोल्युशन (पीव्हीपी-1) कोरोनाला पंधरा सेकंदात नष्ट करण्यासाठी सक्षम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *