![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमातून कार्यसिद्धी होईल. मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल. काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.
वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामात कसलीही हयगय करू नका. नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. विलंबावर मात करावी लागेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. निराशेच्या आहारी जाऊ नका. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
कामाची योग्य पोचपावती मिळेल. उष्णतेचे विकार जाणवतील. मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.
सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. अनपेक्षित गोष्टींचा फार विचार करू नका. भागीदाराच्या मताचा आदर करावा.
कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
कामाची फार चिंता करू नका. चोरांपासून सावध राहावे. जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका. प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे.
तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा. चैनीकडे अधिक कल राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. शेअर्स मधून धनलाभाची शक्यता. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.
धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल. एकंदरीत कामाचा उरक वाढला जाईल. काही वेळेस नमते घ्यावे लागेल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जबाबदारी आनंदाने पार पाडाल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे. घरगुती गोष्टींनादेखील प्राधान्याने विचारात घ्यावे. जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका.
मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. कर्तृत्वाने स्वत:चे महत्त्व पटवून द्याल. कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. सारासार विचार करण्यात भर द्याल. नातेवाईकांना `भेटण्याचा योग येईल.